Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेजवळ खून प्रकरणातील व हत्येचा प्रयत्न करणारा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शिर्डी येथील सागर शेजवळ खून खटला प्रकरणातील व कोरोनामध्ये रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करून फरार असणारा मुख्य आरोपी विशाल कोते याला धुळे येथे पाठलाग करून पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
शेजवळ खून प्रकरणातील फरार आरोपी विशाल अशोक कोते (वय 30 रा. कोतेगल्ली साईसावली निवास शिर्डी तालुका राहता) याला पिंपळनेर (जि. धुळे) बसचा पाठलाग करून पोलिसांनी पकडलेले आरोपी कोते याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात भादावी कलम 307, 367, 394, 452, 341, 323, 504, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे, पोना विशाल दळवी, सुरेश माळी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, पोकाॅ दीपक शिंदे, सागर ससाणे, रोहित येमुल, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments