Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

करोडी ग्रामपंचायत - सत्ताधा-यांवर विरोधकांची कुरघोडी ; अखेर उपसरपंचपदी डाॅ राजेंद्र खेडकर तर सरपंचदी आश्रू खेडकर विराजमान

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

पाथर्डी - तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या करोडी ग्रामपंचायतीमध्ये जय शनीमारुती ग्रामविकास परिवर्तन व शनीमारुती प्रतिष्ठान विकास या दोन्ही पॅनलने जरी युती करून मोठ्या खुबीने सत्ता काबीज करून सरपंचपदी आश्रू भागीनाथ खेडकर यांना विराजमान केले आहे. परंतु सत्ताधा-यांच्या कारभारावर करडी नजर ठेवण्यासाठी अखेर जय हनुमान पॅनल यांनीही मोठ्या खुबीने उपसरपंचपद आपल्याकडे खेचून आणून सत्ताधा-यांवर विरोधकांनी चांगलीच कुरघोडी केली आहे. या उपसरपंचपदी डाॅ. राजेंद्र खेडकर यांची वर्णी लागली असून, यांच्या रुपाने एकप्रकारे गावाच्या कारभारावर अकुंश असणार आहे.
करोडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बाबासाहेब महादेव खेडकर, मनिषा संतोष खेडकर, दिनकर काशिनाथ खंडागळे, मंगल शिवनाथ वारे, सुनिता सतीश गोल्हार, सुनील नरेंद्र खेडकर, सविता सागर खेडकर यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.Post a Comment

0 Comments