Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मंगळवार (दि.23) दु.3 वा. महामार्गावरील अतिक्रमण काढीत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील बसस्थानकजवळ ओम बेकर्स अॅन्ड डेअरीसमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 661 वरील अतिक्रमण काढत असताना दत्तात्रय हरीभाऊ जाधव याने आमच्या सहका-यांना व मला शिवीगाळ केली. तसेच माझ्या दुकानासमोरील जागा तुमच्या बापाची आहे का? असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण करून लाथाबुक्क्यांनी व चापटीने मारहाण करून परत जर येथे काम करण्यासाठी आले तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याची फिर्याद शाखा अभियंता राजेंद्र शिवाजी कुलांगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून दत्तात्रय हरीभाऊ जाधव (रा. चिचोंडी पाटील, ता. जि अहमदनगर) याच्यावर गु.र. नं. 85/ 2021 भादंवि कलम 353, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोहेकाॅ आर.एन. राऊत व मपोकाॅ संगीता बडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments