Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कराऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: जिल्हयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असून त्यामध्ये कोटपा 2003 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलिस मुख्यालय अहमदनगर येथे एक दिवसीय कार्यशाळी घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कोटपा 2003 कायदा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी कलम 5, कलम 6 अ व 6 ब, 7 या सर्व कलमांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सर्व पोलिस प्रमुखांना आदेशित करुन कोटपा कायद्याअंतर्गत जिल्हयात प्रभावी कार्यवाही करण्याबाबत सांगितले. 

आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेवासे आणि श्रीरामपूर येथे १८ फेब्रुवारीला बैठक
अहमदनगर:- आजी/माजी सैनिकांचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवरील समितीची बैठक गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11 वाजता  तहसिल कार्यालय नेवासा येथे तर तहसिल कार्यालय श्रीरामपूर येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ज्या आजी, माजी सैनिकांचे जमिनीबाबत, अतिक्रमणाबाबत, निवृत्तीवेतनाबाबत, कुटूंबियांवरील अन्यायाबाबत काही प्रश्न, अडचणी असतील अशा आजी, माजी सैनिकांनी वरील प्रमाणे आपापल्या तालुक्यातील समितीच्या बैठकीस उपस्थित रहावे व आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरुपात दोन प्रतीत अर्ज बैठकी दरम्यान सादर करावेत. असे आवाहन विजय बाबुराव वाघचौरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या वतीने ४ व ५ फेब्रुवारीला नोंदणी अभियान
अहमदनगर:  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अहमदनगर यांचेतर्फे जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवती, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवारांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY 3.0  तसेच STRIVE  योजनांतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. योजनेसाठी उमेदवारांची जमवाजमव व समुपदेशन करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मर्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांनी दिनांक 4 फेब्रुवारी व 5 फेब्रुवारी, 2021 या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये संयुक्तिक उमेदवार नोंदणी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. यास्तव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण अहमदनगर येथे वरील दोन दिवशी प्रशिक्षण घेण्यास जिल्हयातील इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी सभागृह उपलब्ध करुन दिलेले आहे. तसेच नोंदणी फॉर्म उपलब्ध करुन दिलेला आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधून नोंदणी फॉर्म भरुन द्यावा व मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्हीही कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
यासाठी अहमदनगर जिल्हा कोशल्य विकास समितीने मान्यता दिलेले सेल्फ एम्प्लॉईड टेलर, टेक्निशियन ऑदर होम अप्लायंसेस, सीसीटीव्ही  इन्स्टॉलेशन टेक्निशियन, सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, कन्साईनमेंट बुकिंग असिस्टंट, वेअरहाऊस पॅकर, ब्युटी थेरपिस्ट, रिटेल सेल्स असोसिएट, मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर, फिल्ड टेक्निशियन कॉम्प्युटिंग ॲण्ड पेरीफेरल, फिल्ड टेक्निशियन नेटवर्किंग ॲण्ड स्टोरेज,  इ. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांना STRIVE योजने अंतर्गत DGET  मार्फत संलग्नता मिळालेल्या  सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, सीएनसी प्रोग्रामर, सीएनसी प्रोग्रामर ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन टु थ्री व्हिलर, रेफ्रिजरेशन इक्विपमेंट मेंटनंस स्पेशालिस्ट इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केलेले आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास विभाग सहकार्य करत आहे. प्रशिक्षण क्षेत्र व अर्जाचा नमुना कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज  https://www.facebook.com/ ahmednagar.skill   येथे तसेच कार्यालयातही उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार  https://forms.gle/4nekxo7zjzqzb6k4A  या गुगल फॉर्मला भेट देऊनही प्रशिक्षणासाठी नोंदणी करु शकतात.
सदरचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण अहमदनगर येथे दिनांक 4 व 5 फेब्रुवारी, 2021 या दोन दिवशी उपलब्ध प्रशिक्षण फॉर्म सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भरुन देण्यात यावा अथवा कार्यालयास डाक/ ई-मेलव्दारे पाठविण्यात यावा. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयास  0241-2425566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वि. जा.मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, अहमदनगर यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments