Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्नी व मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरची आत्महत्या

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
कर्जत- पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देऊन त्यांचा मृत्यू झाल्यावर कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनीही आत्महत्या केली आहे. आपल्या कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान द्यावी, अशी इच्छाही डॉ. थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे. मनमिळावू स्वभावाच्या डॉक्टरांच्या अशा जाण्याने राशीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. महेंद्र थोरात यांचे राशीनमध्ये हॉस्पिटल आहे. आज त्यांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र थोरात , वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय १६) व लहान मुलगा कैवल्य (वय ७) हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments