Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अवैधरित्या गौणखनिज उत्खनन प्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा बुधवारी होणार लिलाव

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करीत असताना अहमदनगर तालुक्यात पकडलेल्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्येज्या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही, त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अहमदनगर येथे हा लिलाव होणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.
या लिलावात भाग घेऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणार्‍या जंगम मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती यासाठी तहसील कार्यालय, अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जास्तीत जास्त लोकांनी आणि संस्थांनी या जाहीर लिलावात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments