Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माहिती व जनसंपर्क विभागात अपुरे मनुष्यबळ ; अनेक पदे रिक्त

 

काही विभागांचा कारभार प्रभारींकडे 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाला सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. या विभागात अनेक पदे रिक्त आहेत. महासंचालकांच्या अखत्यारीत मुंबई संचालकाची पाच तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत. 

मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये ही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त आहे. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे पद रिक्त आहे. चंद्रपूरचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्हा माहिती अधिकार्‍याकडे तर गोंदियाचा अतिरिक्त कार्यभार भंडारा जिल्हा माहिती अधिकारी अधिकाऱ्याकडे आहे. जिल्हा पातळीवरही वर्ग 2 आणि वर्ग 3 ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची दैनिक दिन कामकाज जास्त असते. त्यामुळे या खात्यात पदभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याची गरज आहे. शासनाने इतर काही विभागाच्या भरती प्रक्रियाला मंजुरी दिली आहे. हे येथे उल्लेखनीय माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रिक्तपदे सर्वच विभागात आहेत. आम्ही इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कारभार दिल्याने कामकाजावर परिणाम होत नाही. ही पदे भरली जावीत म्हणून शासनाकडे प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments