Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मारहाण प्रकरणी चार जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर तालुका तालुक्यातील गुंडेगाव येथील एकास चारजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवार (दि. 24) दुपारी साडेचार वाजता मल्हारी कुंडलिक कोतकर, मिरा मल्‍हारी कोतकर, अजय मल्हारी कोतकर, भाऊसाहेब मल्हारी कोतकर (सर्व रा. गुंडेगाव, ता.जि. नगर) यांनी माझ्या पोरांना आडवून मारले का? असे म्हणाला असता. पुरावा दे असे म्हणाल्याचा राग येऊन थोबाडीत मारून अजय व भाऊसाहेब याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. मल्हारी व मिरा हे म्हणाले की, तू कोर्टात गेल्यावर व विहिरीवर कसा येतो ते पाहून घेऊ अशी धमकी दिली, या रामदास हरिभाऊ कोतकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर सी ससाणे हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments