Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपूर्ण दस्ताऐवजासह ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई : सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता अर्ज ऑनलाईन स्वरुपात दि. 1 ऑगस्ट, 2020 पासून स्विकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील दि.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांचे सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व ऑनलाईन सेवा शुल्क भरल्यानंतर संबंधीत अर्जदार यांनी अर्ज दस्ताऐवजासह समितीस सादर करणे अनिवार्य आहे. अनेक अर्जदार यांनी मुळ दस्ताऐवज व मुळ प्रतिज्ञापत्रे अद्यापि सादर केलेले नाही तसेच बऱ्याच अर्जदारांनी विलंबाने सादर केल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस विलंब होत आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणारे/ लाभ घेऊ इच्छिणारे अर्जदार यांनी कृपया अर्जासोबत ऑनलाईन प्रक्रियेवेळी सादर केलेले दस्ताऐवज व मुळ प्रतिज्ञापत्र पत्र (वंशावळ सत्यता प्रमाणपत्र) यासह संबंधीत समिती यांचे समक्ष सादर करावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments