Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर रेखा जरे खून प्रकरणी न्यायालयात 1 हजार 500 पानांचे दोषारोपञ दाखल ; पसार बाळ बोठे अटकेनंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार !

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी एकूण 1 हजार  500 पानांचे दोषारोपपत्र ( चार्जसीट) पारनेर न्यायालयात शुक्रवारी (दि. 26) दाखल करण्यात आले असल्याची माहिती वकील संकेत ठाणगे यांनी दिली.
मयत जरे यांच्या खुनात सहभाग असणारा पत्रकार बाळ बोठे हा गेल्या 3 महिन्यापासून अद्यापही फरार आहे. जेव्हा बोठे हा अटक करण्यात येईल तेव्हा त्याचे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार (नगर) या पाचजणांविरोधात आरोपपत्र ( चार्जसीट) दाखल करण्यात आले असल्याचे अॅड ठाणगे यांनी सांगितले.

रेखा जरे यांच्या खून प्रकरणाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या खून प्रकरणात एकूण पाच आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा अद्यापही सापडलेला नाही. यामुळे तीन महिन्यानंतरही जरे खून प्रकरणाचे कारण गुलदस्त्यातच आहे.


 नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रेखा जरे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्यादिवशी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या दोघा आरोपींना जरे यांच्या खून प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी आदित्य सुधाकर चोळके याने सुपारी दिल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना कोल्हापूरमधून अटक केली होती. पत्रकार बाळ बोठे याने भिंगारदिवे याच्यासह संगनमत करूनच चोळके याला मयत जरे यांच्या खूनची सुपारी दिल्याची कबुली भिंगारदिवे याने दिलेली आहे. यानंतर पसार झालेल्या बोठे याचा शोध पोलिस अद्यापही घेत आहेत. मयत जरे यांचा खून करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला होता. जरे यांचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र नेमके कोणते होते. याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते. पोलिसांच्या तपासात ते हत्यार चाकू असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून तो चाकू जप्त केला आहे. जरे यांच्या गळ्यावर व खांद्याजवळ धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जखम झाली होती. ही जखम झाल्यावरच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. त्यावेळी झालेल्या झटापटीत जरे यांच्या खांद्याजवळ चाकू लागल्याचे समोर आले होते. त्याला शोधण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यात आला आहे. परंतु पोलीसांना अद्यापही जरे यांच्या खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही, यामुळे पसार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केल्या केल्यानंतरच घटनेतील खरे कारण पुढे येईल. यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील सर्वांचेच बाळ बोठे याच्या अटकेकडे लक्ष लागले आहे.Post a Comment

0 Comments