Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बीड : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी लाचखोरी करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. वाहन चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना येथील उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत काल रात्री ९ वाजता जालना येथील पथकाने केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनूसार, अवैध वाळूची गाडी सुरू करण्यासाठी तक्रारदारास उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याने चालक लक्ष्मण काळे याच्या मार्फत लाचेची मागणी केली होती. शिवाय वाळू वाहतूक सुरु होताच गाडी पकडून ती तहसील कार्यालयात लावून सोडण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत मागणी केली. त्यामुळे वाहतूकदाराने थेट जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार जालना येथील एसीबीचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे व सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता उपविभागीय कार्यालयाजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे चालक लक्ष्मण काळे लाच स्वीकारण्यास एका हॉटेलमध्ये आला. ६५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला झडप घालून पकडले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाडला कार्यालयातून ताब्यात घेतले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments