Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मेहुण्याने मारले दाजीला ; दोघे अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यात वाळुंज फाटा येथे मोरेवस्ती या ठिकाणी बायकोच्या भावाने स्वतःच्या दाजीला मारल्याची घटना रविवारी (दि.21) राञी घडली. या घटनेनंतर बायको व मेहुण्याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.21) नगर तालुक्यात मयत संतोष दत्तात्रय मोरे (वय42) त्याचे पत्नीस नेहमी घरगुती कारणावरून त्रास देत होता. या कारणावरून रामेश्वर विठ्ठल दशवंत ( रा. ताहराबाद ता. राहुरी जि. अहमदनगर, प्रियंका उर्फ शारदा संतोष मोरे (रा.मोरेवस्ती वाळुंज फाटा ता. जि. अहमदनगर) यांनी संगनमत करून यानी मयत संतोष मोरे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, आरोपी रामेश्वर दशवंत याने लोखंडी कुर्‍हाडीने तुब्याकडील बाजूने मयत संतोष यांच्या डोक्यावर मारून जीवे ठार मारले आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील व नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांनी भेट दिली. घटनेतील आरोपींना अटक करून हत्यार लोखंडी कु-हाड जप्त करण्यात आले.
घटनेनंतर संदीप सोपान मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गु र.न. व कलम:- I 81/2021 भादवी कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. घटनेतील आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपासास नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर.जारवाल हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments