Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हवेली तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची ; कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत हवेली तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय येथे विविध संवर्गातील रिक्त पदांची, कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदरील पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदर पदांवी भरती थेट मुलाखतीद्वारे दि. 6 मार्च 2021 रोजी पार पडणार आहे. तथापि पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पद भरेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सदरची प्रक्रिया राबविण्यात येईल. परंतू वेगळी जाहिरात दिली जाणार नाही.
सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती या राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे यांचे संकेतस्थळ (https://punezp.mkcl.org) वर प्रसिध्द करण्यात आलेली असून उमेदवारांनी संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष व्यक्तीश: दि. 1 मार्च 2020 पर्यंत सादर करावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी केले आहे.Post a Comment

0 Comments