Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टोल नाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची फसवणूक !

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे - टोल नाक्यावर वाहनचालकांना बनावट पावत्या देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदेश प्रकार गंगावणे (वय 25 वर्षे, रा. धूम काॅलनी, ता.वाई, जि.सातारा), अक्षय तानाजी सणस (वय 22 वर्षे, रा. नागेवाडी, ता.वाई जि.सातारा), शुभम सिताराम डोलारे (वय 19 वर्षे, रा. जनता वसाहत, पुणे), साई लादुराम सुतार वय (वय 25 वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे), हेमंत भाटे, दादा दळवी, सतिश मरगजे, संकेत जयवंत गायकवाड आणि अजय काशिनाथ चव्हाण, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर 190 रुपयांची टोल पावती असताना 100 रुपये घेऊन वाहनचालकांना टोलपावती न देता सोडून दिले जात असल्याचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता. या शिवाय टोल नाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालक व शासनाची फसवणूक केली जात असल्याची ऑनलाइन तक्रारही ग्रामीण पोलिसांकडे आली होती.
या सर्व तक्रारींची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाका येथे छापा टाकण्यात आला. यावेळी त्यांना संगनमताने पीएसटीआरपीएल कंपनीने छापलेल्या मूळ (ओरिजनल) पावत्याप्रमाणे नकली (डुप्लीकेट) पावत्या तयार करून त्या पावत्या वाहन चालकांना देवून स्वतः आर्थिक फायदा करून शासनाची तसेच टोलनाका चालकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 5 हजार 700 रू. किंमतीच्या डुप्लीकेट एकूण 30 पावत्या तसेच डुप्लीकेट पावत्या देवुन जमा झालेली एकुण रक्कम 32 हजार 70 रुपये व मोबाईल फोन, तसेच बनावट पावत्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन संगणक तसेच दोन प्रिन्टर, बनावट पावत्या तयार करण्यासाठी वापरण्यासाठी आलेला कागदी रोल, असा एकूण 70 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Post a Comment

0 Comments