Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अपहरण केलेल्या मुलाची सुटक करून पाचजणांना अटक ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या चार वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथे सुटका करून पाच अपहरणकर्त्यांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे ( वय 25 रा. फलटण चौकीजवळ कोठला, अहमदनगर), अल्मस ताहीर शेख (वय 18 रा. कोठला अहमदनगर), मुसाहिब नासिर शेख (वय 21 मुकुंदनगर अहमदनगर), आसिफ हिनायत शेख ( वय 24 रा कोठला अहमदनगर), फैरोज रशीद शेख (वय 25 रा. कोठला अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अपहरणकत्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अमरावती शहर पोलिसांचे पथक तपासकामी नगर येथे पाठवले. पथक अहमदनगर येथे दाखल झाल्यानंतर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घडलेल्या गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देऊन माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने हिना शेख, अल्मस शेख, मुसाहीब शेख यांना अहमदनगर शहरातील विविध भागातून ताब्यात घेतले. त्याना पोलिस खाक्या दाखवताच त्या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली, तसेच अपहरण केलेल्या मुलगा असिफ शेख व फैरोज शेख यांच्या ताब्यात असल्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचा-यांनी आरोपीचा नगर शहरात शोध घेत असताना अपहरणकर्ते हे मुलाला घेऊन अहमदनगर येथून कल्याण रोडने गेले असल्याची माहिती मिळाली. अपहरणकर्ते हे एका दुचाकीवरुन मुलास घेऊन कल्याण दिशेने जात असताना त्याचा पाठलाग करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
अपहरणकर्त्याना पुढील कारवाईसाठी अमरावती राजापेठ पोलिस ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर अपहरण करण्यात आलेला मुलगा नयन मुकेश लुणिया यालाही पुढील कार्यवाहीसाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ मन्सुर सय्यद, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकाॅ सोनाली साठे, विजय धनेधर, रोहित येमुल, सागर ससाणे, योगेश सातपुते, जालिंदर माने, मयूर गायकवाड, कमलेश पाथरूट, चापोहेकाँ बबन बेरड, चापोना शरद बुधवंत आणि अमरावती शहर राजापेठ पोलीस ठाण्याचे पोसई कृष्णा मापारी व त्यांचे पोलिस सहकारी पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.

Post a Comment

0 Comments