Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक पकडला ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असून त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रकने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी ( दि.16) राञी 4 वा. पकडण्यात आला. गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा.कलांडी ता निलगा जि. लातूर )अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे मंगळवारी ( दि.16) राञी 4 वा. रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असूनही गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे व त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रक ने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी ( दि.16) राञी 4 वा. पकडण्यात आला. या कारवाईत 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक व 7 लाख रुपयांचा तांदूळ असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांनी केली. वाघमारे व घोरपडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुध्द भादवी कलम 420,465,,467,468,34.जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3,7 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप हे करीत आहे.
Post a Comment

0 Comments