Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोल्डमॅन सचिन नाना शिंदे याचा खून

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे - गोल्डमॅन सचिन नाना शिंदे याचा खून करण्यात आला आहे. पुणे - नगर महामार्गावरील लोणीकंद या ठिकाणी अॅक्सीस बँकेसमोर अज्ञात हल्लाखोरांनी गोळ्या झाडून हा खून केला. सचिन शिंदे यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल होते. शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

लोणीकंद परिसरात तो गोल्डमॅन म्हणून परिचित होता. सचिन शिंदे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खून, खूनाचा प्रयत्न यांसह इतरही अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याला काही गुन्ह्यांखाली अटकही करण्यात आली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता.
लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास उभा असताना सचिन शिंदे याच्यावर मंगळवारी (9 फेब्रुवारी 2021) दुपारी गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ती अॅक्टीव्हा गाडीवरुन आल्या. त्यापैकी पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने सचिन शिंदे याच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी सचिन शिंदे याच्या मानेजवळ लागली. तो जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे याला पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोणिकंद पोलिसांनी गुन्ह्याची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments