
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - तालुक्यातील अत्यंत राजकीय प्रतिष्ठेच्या झालेल्या हसनापूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शोभा नवनाथ ढाकणे तर उपसरपंचपदी गणेश रामराव ढाकणे यांची निवड झाली आहे.
हसनापूर ग्रामपंचायत अत्यंत चुरशीची होऊन तीन मंडळ निवडणूक रिंगणात उतरले होते केदारेश्वरचे माजी संचालक नवनाथ ढाकणे यांच्या मंडळाने 9 पैकी 5 जागा जिंकून विद्यमान सरपंच संपत ढाकणे यांच्या मंडळाचा मोठा पराभव केला होता त्यांना चार जागा मिळाल्या तर तिसऱ्या गटाला एकही जागा मिळाली नाही. सरपंचपदासाठी शोभा नवनाथ ढाकणे, व सुनीता चांगदेव ढाकणे यांचे उपसरपंच पदासाठी गणेश ढाकणे व अंकुश ढाकणे यांचे अर्ज दाखल झाले होते ते कायम राहिल्याने अखेर मतदान होऊन सरपंच शोभाताई ढाकणे व उपसरपंच गणेश ढाकणे यांना प्रत्येकी 5 मते मिळाली तर विरीधी मंडळास 4 मते मिळाली गेली नूतन निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
👉
गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर विश्वासात घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलून पिण्याचे पाणी, रस्ते, व वाडीवस्तीवर वीज पुरवठा ही कामे प्राधान्याने मार्गी लावून शासनाच्या विकासात्मक योजना प्राधान्याने राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची नवनिर्वाचित सरपंच शोभा ढाकणे व उपसरपंच गणेश ढाकणे यांनी ग्वाही दिली.संकलन : बाळासाहेब खेडकर
0 Comments