Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्यास शासनाची मान्यता : उमेश परहर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

अहमदनगर-  राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील घटकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सदर जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. सदर योजना जिल्हा परिषदेमार्फत अंमलात आणली जाते. सदर योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे मलनि:स्सारण, वीज, गटार बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम इत्यादी विकास कामाचा समावेश आहे. त्यामध्ये खुली व्यायामशाळा या कामाचा समावेश नाही. तथापि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजने अंतर्गत करावयाच्या कामांमध्ये अहमदनगर जिल्ह्याकरिता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य साहित्य या कामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे, या कामासाठी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती अहमदनगर जि.प. समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर यांनी दिली.

सदर योजनेस मान्यता व निधी मिळण्यासाठी समाज कल्याण समिती जिल्हा परिषद अहमदनगरच्या माध्यमातून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य या कामाचा समावेश करण्यात येऊन मान्यता व निधीची तरतूद केलेली आहे. ही योजना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये खुली व्यायामशाळा साहित्य देणार आहे. समाजातील मुलामुलींना व तसेच महिलांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोग होणार आहे. सदर योजनेचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून तातडीने मागे घेण्यात आले आहे. सदर योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा लाभ होण्यासाठी तसेच सदर योजना निधी खर्च होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सदर योजनेच्या प्रस्तावास शासनाची मान्यतेसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे आदींनी विशेष प्रयत्न केले, असल्याचे श्री परहर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments