Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर चिंचपुर पांगुळ सरपंचपदी सौ. प्रगती बडे यांची निवड ; सरपंचपदावर वर्णी न लागल्याने खाजगीत नाराजी !
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - तालुक्यात अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता राखण्यासाठी नेहमीच हातचा राखून आपली रणनिती यशस्वी करणारे बडे पाटील घरण्याने याही निवडणुकीत विरोधकांवर मात करत, युवानेते तथा अहमदनगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष धनंजय पा.बडे यांनी चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीत पत्नी सौ. प्रगती धनंजय बडे यांना सरपंचपदी बसून आपल्या घरातच ग्रामपंचायतीची सत्ता ठेवून घरण्याची परंपरा राखली आहे. तर उपसरपंचपदी ज्ञानदेव महादेव मेरड यांची निवड करण्यात आली आहे. 
दरम्यान यावेळेस घरण्याची परंपरा मोडीत काढली जाऊन अनेकांना वाटत होते की, निवडून आलेल्यांपैकी अन्य महिलांमधीलच सरपंच होईल, पण तसे काही झाले नसल्याने काही अपवादांनी खासगीत नाराजी व्यक्त केली असल्याची दबक्या आवाजात चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
पाथर्डी विधांनसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व दगडुपाटील बडे यांच्या सुनबाई तथा भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय  बडे पाटील यांच्या पत्नी सौ. प्रगती धनंजय बडे यांची निवड करण्यात आली. तर  ज्ञानदेव महादेव मेरड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलच्या सर्व जागा जिंकून आल्या होत्या. कै गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे सौ प्रगती बडे यांच्याकडून सरपंचपदासाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला होता. 
चिंचपुरपांगुळ ग्रामपंचायतीत सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच पदासाठी सौ बडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वानुमते सौ. प्रगती धनंजय बडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर निवड समितीकडून सौ.प्रगती धनंजय बडे यांना विजयी घोषित करण्यात आले.चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायतीत सत्ता गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलच्या हाती आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा. 

यावेळी पॅनल प्रमुख धनंजय बडे, शामराव बडे पाटील, वडगावचे माजी सरपंच आदिनाथ बडे यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंचपदासाठी निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री कराळे, तलाठी मनोज खेडकर, ग्रामविकास अधिकारी श्री रोढे आदींनी निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी बंडू बडे , रावसाहेब बडे, नवनाथ बडे, सोमराज बडे तसेच सर्व ग्रा. पं. सदस्य गावातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

संकलन -पत्रकार सोमराज बडे
 मोबा-९३७२२९५७५७

Post a Comment

0 Comments