नगर रिपोर्टर
अहमदनगर - मानवाधिकार अभियान संघटनेच्या शहराध्यक्ष पदी विकास जाधव यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आनिल गंगावणे यांच्या हस्ते जाधव यांना निवडीचे पञ देण्यात आले.
सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारका मध्ये झालेल्या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष राजू धोञे,विजय बेरड,रूपेश म्हस्के, आविनाश गायकवाड,नवनाथ शिदे,विकास माने,विलास धोञे आधी उपस्थित होते.यावेळी नगर तालुकाध्यक्ष पदी विजय बेरड, जिल्हा संपर्कप्रमुख पदी विलास धोञे,कर्जत तालुकाध्यक्ष पदी नवनाथ शिदे,कर्जत तालुकाउपाध्यक्ष पदी आविनाश गायकवाड,कर्जत तालुका संघटकपदी विकास माने याच्याही निवडी यावेळी करण्यात आल्या.
संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष अँड. संतोष गायकवाड,उपाध्यक्ष संध्या मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे यांनी केले.
0 Comments