Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- मागील तीन वर्षापासून फरार असणारा दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अहमदनगर शहरातील वसंत टेकडी परिसरात सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडण्यात आला. प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 34 रा. वसंत टेकडी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 19 फेब्रुवारी 2018 ला ट्रक ( एमएच 16 एवाय 9833) यामध्ये 4 लाख रुपयांच्या कांद्याने भरलेल्या 450 गोळ्या घेऊन ट्रकचालकासह वांबोरी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना सायंकाळी राहुरजवळ आले असता, शामराव भागवत गाडे (रा. घोरपडवाडी ता. राहुरी) व त्याच्यासोबत असणाऱ्या तीन अनोळखी इसमांनी ट्रक आडवून कांद्यासह बळजबरीने चोरून नेला. या अर्जुन काशिनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात भादविक 395 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी प्रमोद कराळे याला वसंतटेकडी, अहमदनगर परिसरात सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. आरोपी कराळे याच्यावर यापूर्वी तोफखाना, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ विश्वास बेरड, पोना सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, पोकाॅ सागर ससाणे, रोहित येमुल, मयूर गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments