Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोषारोपपञात व्हाईटनर लावून कलम काढले ; पोलिस कर्मचारी निलंबित

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे - दोषारोपपञात व्हाईटनर लावून कलम काढून आरोपीस वाचविण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवत चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश काढले आहेत. पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये (नेमणूक – चाकण पोलीस स्टेशन) असे निलंबित पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

समजलेली माहिती अशी की, चाकण पोलीस ठाण्यामध्ये जुलै 2020 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्या दाखल गुन्ह्यात 326 हे कलम लावणे आवश्यक होते. परंतु या गुन्ह्यात 326 कलम जाणीवपूर्वक लावण्यात आले नाही. यानंतर या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करताना दोषारोपपत्र व अन्य कागदपत्रांवर व्हाईटनरचा वापर करण्यात आला. 
आरोपीच्या दोषारोपपञात खाडाखोड करून व्हाईटनरने सरकारी दस्तऐवजात बदलण्यात आले. आरोपीला संबंधित गुन्ह्यातून आरोपीला वाचविण्यासाठी मदत करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत पोलीस नाईक अशोक जायभाये यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शिबीर टाळण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या परस्पर  जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत त्या कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबन केले होते. त्याचे आदेश सोमवारी काढले होते. लगेच दुस-या दिवशी (मंगळवारी) आणखी एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे कर्तव्यात कसूर करणा-या पोलिसांवर पोलीस आयुक्तांकडून थेट कारवाई केली जात आहे. या अतिदक्ष पोलीस आयुक्तामुळे शहर पोलिस दलात कमालीचा बदल होत आहे.


Post a Comment

0 Comments