Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरमध्ये नव्या ३एस फॅसिलिटी शोरूमचे उदघाटन

 


३एस फॅसिलिटी शोरूमसह एमजने अहमदनगर मधील आपली रिटेल उपस्थिती बळकट केली ; एमजीने  महाराष्ट्रात आपल्या उपस्थितीचा केला विस्तार 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : एमजी मोटर इंडियाने अहमदनगरमध्ये आपली नवी कोरी ३एस फॅसिलिटी शोरूम सुरू केल्यामुळे महाराष्ट्रात विस्तार करतानाच आता किरकोळ बाजारपेठेत देखील उपस्थिती मजबूत केली आहे. प्रतिष्ठित ‘एमजी अहमदनगर’, असे नवीन शोरूम चे नाव असून,  एमजीनेआपल्या वाहनांच्या वाढत्या मागणीच्या दृष्टीने देशभर किरकोळ उपस्थिती वाढविण्याचे ठरवले आहे. अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर असलेल्या या नव्या शोरूमचे उद्घाटन सोहमग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. 


सध्या एमजीच्या कार लाइनअपमध्ये हेक्टर प्लस, ग्लॉस्टर-भारताची पहिली स्वायत्त स्तराची(ऑटोनॉमस लेवल )  1 एसयूव्ही,न्यू हेक्टर 2021, आणिप्युर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही, झेडएसइव्ही 2021 यांचासमावेश आहे. अहमदनगरमध्ये हेक्टर प्लसच्या  6-आणि  7 सिट्सच्या  व्हेरीयंटला  जोरदार मागणी आहे. अहमदनगरमधील कारप्रेमी आतात्यांच्या पसंतीच्या एमजी कार ऑनलाइन किंवा डीलरशिपद्वारे देखील बुक करू शकतात. नवीन सुविधेच्या उद्घाटनासह, एमजी आपल्या ग्राहकांना उत्पादनांचे विस्तृतपोर्टफोलिओ आणि विक्री-नंतरची  सर्वोत्तमसेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. एमजी आपली कार विकत घेणाऱ्या कारमालकांना चांगल्या किमतीत सर्वोत्तम उत्पादनाची खात्री तर देतेच परंतु कार वापरल्या नंतर विकायची असल्यास सर्वोत्तम रिसेल व्हॅल्यू अर्थात पुनःविक्री मूल्यांचे देखील आश्वासन देते. उद्घाटनानंतर आपली प्रतिक्रिया देताना एमजीमोटर इंडियाचे डीलर डेव्हलपमेंटचे संचालक पंकज पारकर म्हणाले, “महाराष्ट्रातील एमजीसाठी महत्त्वाचे बाजारपेठ असलेल्या अहमदनगरमध्ये प्रवेश केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. एमजीची आता राज्यात ३२ केंद्रे आहेत आणि २०२१ अखेर यांची संख्या ४५ केंद्रांवर पोहोचविण्याचे उद्दीष्ट आहे. आमच्या संभाव्य ग्राहकांच्या जवळ आमची रिटेल उपस्थितीवाढविण्याच्या आमच्या योजनेचाचा एक भाग म्हणजे एमजी अहमदनगर आहे. ही नवीन सुविधा आम्हाला संपूर्ण प्रदेशातील ग्राहकांच्या आधुनिक अपेक्षा आणि  आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करेल. ”यावर्षी नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेसह, आमचेउदिष्ट सध्याच्या  65+ शहरांमधील 250+ केंद्रांच्या उपस्थितीच्या पलीकडे विस्तार करण्याचे आहे. यावेळी बोलताना प्रतिश शाह, डीलर प्रिन्सिपल, एम.जी. अहमदनगर म्हणाले, की “ऑटोमोटिव्हरिटेलच्या भविष्याबाबत एमजीच्या दृष्टीकोनाबद्दल आम्ही खूपच सकारात्मक असून नवीनशोरूमच्या मध्यमाने या भागातील ग्राहक सेवेसाठी नवीन बेंचमार्क तयार करण्याचे आमचेलक्ष्य आहे. आमच्या ग्राहकांना उतकुष्ट खरेदी अनुभव देण्यासाठी आम्ही डिजिटल टूल्सची आणि नव नवीन उपकरणांची मदत घेतली आहे. आमचा विश्वास आहे की एमजी अहमदनगर येथे आमच्या ग्राहकांना खरोखरच एक संस्मरणीय आणि उत्तम अनुभव मिळेल. ”एमजी शिल्ड अंतर्गत, विनामूल्य तीन ‘5 एस’ म्हणजेचविनामूल्य 5 वर्ष / अमर्यादित किलोमीटर्सची  वारंटी, 5 वर्षांचे रोडसाइड असिस्टनस आणि प्रथम 5 सेवांसाठी मोफत लेबर चार्जेस यांचं समावेश आहे. या वैशिष्ट्यांचा उद्देश एमजी मालकीचा अनुभव अत्यधिक सुखद करणे हा आहे तसेचएमजी ग्राहकांना संपूर्ण मनःशांती प्रदान करणे आहे. एमजी हेक्टरची टोटल कॉस्टऑनरशिप अर्थात  (टीसीओ) आपल्याला अत्यंत किफायतशीर ठरते, जीपेट्रोलसाठी प्रति किलोमीटर 45 पैसेआणि डिझेलसाठी व्हेरीयंट्ससाठी प्रति किलोमीटर 60 पैसे (100,000 किलोमीटर पर्यंतच्या वापरावर मोजल्यास) पासून सुरू होते. ब्रँड-नवीन शोरूम एमजीच्या "भावनिकगतिशीलता अर्थात ईमोशनल डायनेमिजम" च्या तत्वज्ञानाअंतर्गत डिझाइन केले गेलेआहे, जेसमकालीन ब्रँड घटक आणि स्लीक कलर पॅलेटस या आधुनिक फीचर्सला एकत्र करते. शोरूमच्या दर्शनी  बाजूस, आकाश आणि पृथ्वीचा संगम दर्शविणारा आगळावेगळा देखावा येणाऱ्या सगळ्यांना मोहून टाकतो. स्टोअरच्या आतमध्ये आपल्या संभाव्य ग्राहकांच्या सर्व 5 सेन्सेसलासाद घालेल अश्या इंटेरियर मध्ये मोठ्या एलईडी कॉन्फिग्रेटर वॉल या सारख्याअत्याधुनिक घटकांचा अंतर्भाव आहे.

Post a Comment

0 Comments