Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोहटे गावानजिक ट्रक पलटी ; चालक गंभीर जखमी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- तालुक्यातील मोहटे गावानजिक धोकायदायक अरूंद वळणावर रस्त्याचा चालकाला अंदाज न आल्याने अचानक ट्रक पलटी झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मोहटे गावाजवळ (एमएच16 एई-3999) हा ट्रक अरुंद व धोकादायक वळणावर ट्रकचालकाला अंदाज न आल्याने तीस फूट पुलावरुन सरळ खाली गेला. आवाज झाल्याने गावकरी मदतीला धावले व जखमी अवस्थेत असलेल्या झेंडे नावाच्या चालकाला बाहेर काढले.संध्याकाळी साधारण 8.30 च्या सुमारास मालवाहतूक ट्रक टाकळीमानुरहुन बेसनपीठ खाली करून पाथर्डीकडे जात होता. मोहटेगावाजवळील नवीन झालेल्या 59 क्रमांकच्या राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने केलेल्या तसेच अपूर्ण असलेल्या पुलावरील अपघाती वळणावर हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला आहे. 
या घटनेनंतर धोकादायक वळण काढून टाकावे, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.

संकलन-
पत्रकार सोमराज बडेPost a Comment

0 Comments