Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशीम लाभार्थी नोंदीसाठी जिल्हयात महा-रेशीम अभियानास जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते प्रारंभ

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: रेशीम संचालनालय नागपूर अंर्तगत जिल्हा रेशीम कार्यालय अहमदनगर मार्फत सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०२१ ची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांचे हस्ते महा रेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून महा-रेशीम अभियान २०२१ उद्‌घाटन करण्यात आले. 
अभियानाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत, रोहयो उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा नियोजन अधिकाती निलेश भदाणे, रेशीम विकास अधिकारी बी डी.डेगळे, प्रकल्प अधिकारी पी.व्ही.इंगळे, तसेच सुदर्शन पचलोरे, व्ही.बी.दळवी, गोरख टकले, अनुरथ कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समुहामध्ये रेशीम शेतीस मोठया प्रमाणावर वाव असल्याने शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठया संखेने सहभागी करून घेण्यासाठी सुचित केले. वातावरण बदलामुळे पारंपारीक शेतीमधुन शेतकऱ्यांना निश्चीसत व शाश्वत उत्पन्न मिळणे दिवसेदिवस जिकिरीचे होत चालले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. 
तुती पिकास शासनाने कृषि पिक म्हणुन घोषित केल्यामुळे इतर पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणेसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.शिवाजीराव जगताप यांनी केले. रेशीम अंडीपुजांसाठी ७५ टक्के् व कोष उत्पादनावर प्रती किलो कोषास ५० रूपये जिल्हा वार्षिक योजनेमधुन अनुदान देण्यात येत असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री.निलेश भदाणे यांनी सागितले.
जिल्हयात रेशीम शेतीसाठी असणाऱ्या विविध योजनांचे माध्यमातून लाभार्थी निवड करण्यासाठी शासनाने महारेशीम अभियान २०२१ राबविण्याचे शासन निर्णय काढून निश्चीात केले आहे. अभियान कालावधीमध्ये रेशीम शेतीस वाव असलेल्या निवडक गावामध्ये रेशीम शेती करण्यसाठी रेशीम कर्मचारी , तज्ञ शेतकरी व कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशीम रथाच्या माध्यमातुन जिल्हाभर विस्तार कार्यक्रम घेऊन जनजागृती करून शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
रेशीम विकास अधिकारी श्रो.डेंगळे यानी जिल्हयास सन २०२१-२२ करिता देण्यात आलेल्या २५० एकर तुती लागवडीचा लक्षांक पुर्ततेसाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हयातील निवडक गावामध्ये रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिदधी करण्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन किमान ७५० शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधून किमान ४०० एकर नविन तुती लागवडीकरिता लाभार्थी निवड निश्चि०त करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
कोविड-१९ पश्चारत रेशीम कोषास प्रति किलोस ३५० ते ४५० रूपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्यामुळे रेशीम शेतीस चांगले दिवस आले आहेत. अती वृष्टीमुळे जिल्हयात एकाही शेतकऱ्याचे तुती पिकाचे नुकसान झालेले नाही याउलट कोरोना कालावधीमध्येही शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासून शाश्वतत उत्पादन मिळाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चालू वर्षी जिल्हयात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची मुबलक सुविधा निर्माण झालेली आहे. त्यामुळे रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
सन २०२०-२१ मध्ये १५० एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड करण्यात आलेली असून सध्यास जिल्हयात ४८६ एकर क्षेत्रावर तुती लागवड अस्तित्वात आहे. माहे जानेवारी २०२१ अखेर १५५९५० अंडीपुजाचा पुरवठा करण्यात आलेला असुन त्यापासून ९० मे. टन रेशीम कोषाचे उत्पादन झालेले आहे. रेशीम कोष विक्रीपासून शेतकऱ्याना २१३ लक्ष रकमेचे उत्पन्न मिळालेले आहे. जिल्हयात मनरेगा अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशोम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत प्रति एकर ( सिमीत १.०० एकरापर्यंत ) रक्करम रू. २१३०१०/-अकुशल (मजूरी स्वरूपात) व कुशल रक्कंम रू ११०७८०/- अशी एकूण रू. ३२३७९०/- ची आर्थिक मदत तीन वर्षात विभागून देण्यात येते. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी हा अल्पभुधारक असावा व अनुसुचित जाती जमाती प्रवर्गासाठी ही अट शिथोल करण्यात आलेली आहे. रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याकडे स्वमालकीची जमीन व कुटूंबाचे मनरेगा जॉब कार्ड असावे. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी गावामध्ये किमान ९० शेतकऱ्यांचा गट असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे बारामाही सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी तुती लागवड करण्यासाठी अभियान कालावधीमध्यें नोंदणी करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. पी.व्ही .इंगळे यांनी केले. रेशीम शेती हा शाश्वत उत्पन्न देणारी, कुटुबातील लहान-थोर व्यक्तीअ करू शकणारा शेतीवर आधारीत जोडधंदा असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन केले.
रेशीम शेतीमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, पितळे कॉलनी, महागणपती मंदिराजवळ, नगर -मनमाड रोड नागापूर, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments