Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अवैध वाळू वाहतुकीवर नगर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाईऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या शिवारात नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
हिवरेबाजार ते निमगाव वाघा जाणारे रोडवर अवैध वाळू वाहतूक करणा-यावर डंपरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. सुनिल ओंकार उमाप ( वय 26 रा खारेकर्जुने ता जि अहमदनगर) याच्यावर कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.3 फेब्रुवारीला नगर तालुक्यात हिवरे बाजारगावचे शिवारात हिवरेबाजार ते निमगार वाघा जाणारे रोडवर 10 लाख रुपयांचा एक पांढरे रंगाचे कॅबिन असलेला व पांढरट करडया रंगाची बॉडी असलेला टाटा कंपनीचा ढंपर (क्र MH-02 ER-3680) असा 8 हजार रु.कि.ची चार ब्रास वाळू असे एकूण 10 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर टाटा कंपनीचा डंपर ( MH-02 ER-3680) विनापरवाना बेकायदा वाळू चोरी करुन वाहतूक करतांना मिळून आला आहे. 

Post a Comment

0 Comments