Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी येथील पत्रकार राजेंद्र दूनबळे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
उरण - श्री.छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र, यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र दुनबळे यांना यांच्या उतूंग कार्यांची दखल घेऊन नुकताच त्यांना कोविड योद्धा पुरस्काराने (शाॅल, श्रीफळ, सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह, देऊन) सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सुदेश पाटील, कुंदन पाटील,धनश्री पाटील ,कु,पिहू कुंदन पाटील, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी सन्मानमूर्ती पत्रकार राजेंद्र दूनबळे म्हणाले की, कुठल्याही संकटसमयी एखादी व्यक्ती पुढाकार घेऊन काही सामाजाभिमुख कार्य करण्यास पुढाकार घेत असेलतर त्याचे पाय ओढण्यापेक्षा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून लढ म्हणणार्या शब्दांचा आंनद काही वेगळाच असतो, आणि हाच आंनद आपणास यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकतो,तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीतही घडला आहे, या सन्मानाने माझा आत्मविश्र्वास दुपटीने वाढला आहे, कुठेतरी आपण केलेल्या २५ वर्षांच्या पत्रकारितेची दखल घेतली गेली याचा आनंद होतो आहे,असेही ते म्हणाले.
यावेळी संस्थेच्यावतीने गरजू ३० उपेक्षित महिलांना,साड्या व २० गरजू मुलांना स्वेटरचे वाटपही संस्थेच्यावतीने करण्यात आले.
कोरोना महामारी लॉकडाऊन काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे, आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स,तसेच स्वच्छता कर्मचारी, यांनी आपल्या प्राणांची जराशीही पर्वा न करता केलेली रुग्णसेवा ही ही खरोखरच अविस्मरणीय तथा शब्दात न उच्चारली जावी अशी आहे,यासोबतच वेळोवेळी जनप्रबोधनपर कोविडची माहिती विविध प्रसारमाध्यमातून (वर्तमापत्रे/न्यूज पोर्टल/वृत्त वाहिनीच्या) प्रसारित करून सुरक्षित रहा, मास्क वापरा, वेळोवेळी हाथ धूवा असे सातत्याने आपापल्या प्रसारमाध्यमातून उत्कृष्ठ सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष पत्रकार यांचा कोविड योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजीक संस्था उरण, महाराष्ट्र यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना श्री.दुनबळे म्हणाले की,कोरोना काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण यांच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत तथा सातत्याने या संस्थेच्यावतीने नेहमीच अनेक सामाजाभिमुख उपक्रम राबविली जातात तथा समाजात अनेक सामाजिक कार्य करणार्या समाजसेवकांचे मनोबल अधिकप्रमाणात वाढावे याकरीता त्यांचा यशोचित सन्मानही केला जातो,खर्या अर्थाने या संस्थेचे सामाजिक कार्य सर्वश्रृत तथा सर्वदूर सुपरिचित आहे, या संस्थेच्या विविध समाजाभिमुख कार्यांनी राज्यभरातील अनेक सेवाभावी संस्थांना सुकार्य करण्याची प्रेरणा मिळते शेवटी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, हेमंत पवार,विठ्ठल ममताबादे, प्रेम म्हात्रे यांच्यासह मित्र परिवार, अधिकारी,पदाधिकारी,महिला मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments