Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल किरण गिराम व ऋषिकेश फड यांचा सत्कार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ :- शहरातील किरण गिराम व ऋषिकेश फड यांनी औरंगाबाद येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मराठवाड्यात व्दितीय क्रमांक पटकावल्याबद्दल बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा परळी विशेष भूषण पुरस्कार प्राप्त पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शहरात शनिवार, दि.27 रोजी भगवान बाबा मंदिर जवळील मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात शरीर सौष्ठव स्पर्धेत किरण गिराम व ऋषिकेश फड यांचा पुष्पगुच्छ देऊन बीड जिल्हा कुस्तीगीर परीषदेचे उपाध्यक्ष तथा परळी विशेष भूषण पुरस्कार प्राप्त पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गिराम यांनी 65 किलो गटातून द्वितीय क्रमांक पटकावला तर ऋषिकेश फड यांनी 55 किलो गटातून क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या यशाने परळीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. गिराम व फड यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल पैलवान माऊली मुंडे, पैलवान प्रकाश मुंडे, अजय संगवारे, किरण चव्हाण, विनायक कराड आदींची उपस्थिती होती.
संकलन: पत्रकार महादेव गिते

Post a Comment

0 Comments