ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रात्रीच्या वेळी घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणारे आरोपी मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अविनाश बाळासाहेब घोलमे, रोहित उर्फ सोन्या दिपक काळे ( दोघे रा. शिंदा, ता. कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोना संतोष लोंढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, पोकॉ प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, चापोहे संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments