Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर नगर तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन सपोनि रजपूत निलंबित

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भालसिंग खून प्रकरणात हलगर्जीपणा केेेल्याचा ठपका ठेवून पारनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा याबाबत आदेश काढला आहे. 
सहाय्यक पोलिस निरीक्षक रजपूत हे यापूर्वी ते नगर तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत होते. त्यावेळी वाळकी येथील ओंकार भालसिंग या तरूणाचा खून झाला होता. भालसिंग खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विश्वजित कासारसह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भालसिंग खून प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने रजपूत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सहाय्यक निरीक्षक रजपूत यांची बदली नगर तालुका पोलिस ठाण्यातून पारनेर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. रजपूत यांची पारनेरला बदली झाल्यानंतर ते 15 दिवसांच्या रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी दोनच दिवस पारनेर पोलिस स्टेशनला कर्तव्य बजावले. मात्र दोन दिवसांनंतर रजपूत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नुकतीच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे प्रवीण पाटील यांना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबीत केले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई केल्यामूळे अधिकार्‍यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments