Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना पित्रूशोक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पागोरी पिंपळगाव - अहमदनगर जिल्ह्यातील कै. दत्तात्रय दादाबा ढाकणे रा. पागोरी पिंपळगांव. ता. पाथर्डी हे पागोरी पिंपळगांव येथील शेतकरी नेते राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे यांचे वडील यांचे दि. १७ प्रेबुवारी रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.त्यांच्या माघे अशोक व बाळासाहेब हे दोन मुले आसून सुना व नातवंडे असा परीवार आहे. 
कै. दत्तात्रय दादाबा ढाकणे अत्यंत मनमिळावु व धार्मीक वृत्तीचे होते. तसेच ते पंढरीच्या पांडूरंगाचे व मोहटा देवीचे निस्सीम भक्त होते. भगवंत भक्तीवर त्यांची निष्ठा व श्रद्धा होती. त्यांनी पंढरीच्या पंचविस वाऱ्या केल्या होत्या. त्यांनी संसारात आसुन गुरूकृपेने स्वतःमध्ये खुप बदल करून घेऊन चालता बोलता भगवतांच्या नामस्मरणावर जोर देवून साध्या सोप्या मार्ग स्वीकारला होता. तसेच त्यांनी सद्गुरु समर्थ सुंमत बापु हंबीर विश्वव्यापी मानव धर्म आश्रम पाटेठाण ता. दौंड जि.पुणे यांच्याकडून अनुग्रह घेतला व नामस्मरणावर भर दिला. शेवटच्या श्वासाप्रयन्त देवाचे नामस्मरण करून त्यांनी देह ठेवला. सर्वांशी हासुन खेळुन व चालता बोलता नामस्मरण करून माणसामध्येच ते देव पाहत होते. असे हे सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तीमहत्त्व शेवटच्या क्षणीही सर्वांशी बोलुन हासून व नामस्मरण करुन देह ठेवल्यामुळे पागोरी पिंपळगांव व पंचकृषी परीसरात त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जाते.

Post a Comment

0 Comments