Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पकडण्यात आलेल्या वाळूचा ट्रक लक्ष्मी दर्शनानंतर सोडला ; पोलिस आयुक्तांना घटना समजताच, दोन पोलिस कर्मचारी निलंबित !

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नागपूर : हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडण्यात आलेल्या वाळूचा ट्रक वाहतूकदाराकडून पैसे घेऊन तो ट्रक सोडून दिला. ही सर्व आर्थिक देवाणघेवाणीची घटना थेट पोलिस आयुक्तांपर्यंत गेली. या घटनेची तात्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त यांनी त्या घटनेतील दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांना पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. प्रेमशंकर शुक्ला, अश्विन कुंभरे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध वाळूतस्करी, गोवंशची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही यानंतर हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे प्रेमशंकर शुक्ला व अश्विन कुंभरे या दोघा पोलिस कर्मचा-यांनी अवैध वाळू वाहतूक करणा-यांकडून वसुली केली. पोलिस निरीक्षकांचे नाव सांगून दोघेही पैसे वसूल करीत होते.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहितीनुसार अशी की, दहा दिवसांपूर्वी प्रेमशंकर शुक्ला आणि त्याचा रायटर अश्विन कुंभरे यांनी विहीरगाव परिसरात वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले. ट्रक चालकांनी रॉयल्टी दाखवली. तरीही ट्रक सोडण्यासाठी ३० हजारांची मागणी केली. दोघांनीही १५ हजारांत सेटल करण्यावर तयारी दर्शविली. हुडकेश्वर पोलिस विनाकारण वाळू वाहतूकदारांकडून पैसे उकळत असल्यामुळे काहींनी लेखी तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रेमशंकर शुक्ला आणि अश्विन कुंभरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीत दोन्ही कर्मचारी दोषी आढळले. काही ऑडिओ क्लीपमध्ये पोलिस पैशाचा मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले.
शनिवारी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. पोलिस निरीक्षकांनीही ठाण्यात रोलकॉलवर सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीबाजीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.


Post a Comment

0 Comments