Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोन वर्षापासून फरार असणारा आरोपी जेरबंद ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर तालुक्यातील चास शिवारातील अश्विनी पेट्रोलपंपवर काम करणाऱ्यांने चोरी करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि.14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की दि. 21 मार्च 2019 रोजी चास शिवारातील अश्विनी पेट्रोल पंपावर काम करणारा सोमनाथ जगन्नाथ जाधव याने जमा झालेली 29 हजार 693 रुपये रक्कम संमतीशिवाय लबाडीने चोरून नेली. या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हा सध्या निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे राहात असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. श्री सानप यांनी पोलिस पथकाला सूचना देऊन सापळा लावून औरंगाबाद जिल्ह्यात आरोपी जाधव याला पकडण्यात आले. यावेळी आरोपीस खाक्या दाखवताच आरोपी जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरून नेलेली रक्कम काढून दिलेली, ती रक्कम जप्त करून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार मपोहेकाॅ आमीन शेख, पोना सचिन वनवे आदींसह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments