Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषदेत काम नसताना येणा-यावर आता होणार कारवाई ; मुख्य कार्यकारी अधिका-यांनी काढले फर्मान

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
 उस्मानाबाद - सरकारी काम आणि बारा महिने थांब ही म्हण शासकीय कामातील दिरंगाईमुळे प्रचलित आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो तर तिथे असणाऱ्या गर्दीमुळे प्रत्येकाला त्रास होतोच. या गर्दीत विनाकारण येणारेही असतात. या विनाकारण येणाऱ्या व्यक्तिवर आळा बसावा, यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे.
जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी आस्थापना असलेल्या शिक्षण तसेच ग्रामपंचायत विभागात नेहमी वर्दळ असते. अनेक गुरुजींसह ग्रामसेवक अकारण अथवा किरकोळ कामासाठी शाळा व ग्रामपंचायत सोडून मुख्यालयी येतात. हीच बाब लक्षात घेऊन या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्यासाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नोंदीचा आढावा घेऊन अकारण मुख्यालयी येणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले. त्यामुळे आता अकारण मुख्यालयी येणा-या ग्रामसेवकांसह शिक्षक व अन्य कर्मचा-यांच्या अंगलट येऊ शकते.
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांनी अचानक भेटी दिली. येथे अनेकजण अकारण अथवा किरकोळ कामासाठी मुख्यालयी आले असल्याचे समोर आले. त्यासाठी अशा प्रकाराला कायमचा पायबंद घालण्यासाठी या दाेन्ही विभागांत दिवसभरात कोणकोण येऊन गेले? आणि कोणाकडे? आणि किती वेळा आले? या नोंदी ठेवण्याचे फर्मान त्यांनी काढले. यासाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नियमित आढावा घेतला जाणार असुन, एखादे शिक्षक वा ग्रामसेवक एकाच टेबलप्रमुखाकडे अनेकवेळा आले असतील तर, त्यामागचे कारण शोधले जाणार आहे. यात संबंधिताविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
Post a Comment

0 Comments