ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पार पडलेल्या राज्यस्तरीय विभागीय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीत अहमदनगर महापालिकेच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन बांधकाम व सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
विशेष बाब म्हणून अहमदनगर मनपाच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दोन मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प व कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत तात्काळ कारवाई व्हावी, असे आदेश अहमदनगर जिल्हाधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
0 Comments