Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिसांच्या तब्बल 700 तासांच्या चौकशीनंतर त्याने दिली 93 जणांच्या खूनांची कबूल

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / क्राईम स्टोरी 
वॉशिंग्टन :  जगात गुन्हेगारीत काहीजण आपण माणूस आहोत, हे विसरून ते राक्षीसीवृत्तीने वागतात. अशीच एक अंगावर थरकापा उडवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेमधील 'सॅम्युअल लिटल' या बॉक्सरने आपल्या वयाच्या 30 वर्षापर्यंत एकूण 93 महिलांचा खून केले. त्याची खून करण्याची पद्धत अंगाचा थरकापा उडवणारी असल्याचे पोलिसांच्या तपास उघड झाले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सॅम्यूअल लिटल हा तसा बॉक्सर होता. लिटल याने 30 वर्षापर्यंत तब्बल 93  जणांचा खून केला. या घटनांमध्ये खून केलेल्या काही महिलांची अद्यापही ओळख पटलेली नाही. या भयानक गुन्हेगाराला पोलिसांनी अटक दरम्यान, त्याची तब्बल 700 तास चौकशी केली असता, यानंतर लिटल याने 93 जणांचा खून केल्याची कबुली दिली. लिटल याने हे सर्व खून 1970 ते 2005 मध्ये फ्लोरिडा व साउथ कॅलिफोर्नीया या परिसरात केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या खूनांच्या गंभीरा घटनांमुळे पोलिस यंत्रणा चक्रावून गेली होती. परंतु पोलीसांना एका प्रकरणातील तपासाअंती खून झालेल्या घटनामागील गुन्हेगाराचा शोध लागला. तो असा, फ्लोरिडा व साउथ कॅलिफोर्नीया या ठिकाणाच्या परिसरात महिलांच्या वाढत्या खूनांसारख्या गंभीर घटनामुळे पोलीस यंञणा चक्रावून गेली होती. विशेष म्हणजे पोलिसांना या खूनांच्या घटनांमध्ये कसून तपास करुनही पुरावे मिळत नव्हते. परंतु 2012 साली ड्रग्ज तस्करी प्रकरणात सॅम्यूअल लिटल याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर लिटल याच्या तपास चौकशीअंती महिलांच्या झालेल्या खूनप्रकरणांचा गूढ पोलिसांसमोर आले. ते असे, लिटल याला अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याची डीएनए टेस्ट केली होती. पण यापूर्वी 1987 ते 1989 या कालावधीत झालेल्या 3 खून प्रकरणातील संशयिताच्या डीएनएशी आरोपी लिटल याचा डीएनए मॅच झाला. यानंतर 93 महिलांचा खून करणार हत्यारा हा 'सॅम्यूअल लिटल'च असल्याचे समोर आले.

अमेरिकन तपास संस्था एफबीआयने सांगितल्यानुसार सॅम्यूअल महिलांचे खून करताना स्पेशल टेक्निक वापरायचा. महिलेला पकडल्यानंतर तो पहिल्यांदा बॉक्सिंमध्ये शिकलेल्या स्किलचा वापर करायचा. महिलेला बुक्के मारून तो त्यांना हतबल करुन सोडायचा. नंतर गळा दाबून मृतदेहाची तो योग्य विल्हेवाट लावायचा. मृत महिलेच्या शरिरावर कोणतेही निशान किंवा जखम नसल्यामुळे पोलिसांनाही सॅम्यूअलला पकडणे अशक्य होऊन जायचे. त्याने खून केलेल्यांपैकी बहुतांश महिला या वेश्या व गरीब होत्या.
आरोपी सॅम्यूअल लिटल याला 93 महिलांच्या खूनप्रकणी दोषी ठरवल्या गेल्यानंतर लिटल हा 2014 पासून कारागृहात बंद होता. त्याला आजार झाल्यामुळे त्याच्यावर कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालायात उपचार सुरु होते. परंतु त्याला हृदयविकार व डायबेटीज असल्याने तो वयाच्या 80 व्या वर्षी त्याचा दि. 30 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाला.
Post a Comment

0 Comments