ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
औरंगाबाद : विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे नियम ताेडणाऱ्या सहा क्लासेसवर कारवाई करुन त्यांच्याकडून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
शुक्रवारी मनपा, जिल्हा प्रशासनाकडून ४३ क्लासेसची तपासणी केली. यामध्ये ६ क्लासेस मध्ये कोरोनाबाबतचे नियम पाळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही कारवाई केली. कोचिंग क्लासेस प्रमाणेच मंगल कार्यालये कोरोनाचे नियम पाळत नसतील तर त्यांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. आता शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसच्या मालक चालकांवर मनपा, जिल्हा प्रशासन तसेच पोलिस देखील लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर आर्थिक दंड आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांनी विना मास्क फिरू नये, सॅनिटायझर तसेच हात धुण्याची काळजी घ्यावी तसेच सामाजिक अंतर देखील पाळणे आवश्यक असल्याचे आवाहन महानगर पालिका, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments