Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट ; अभिनेत्रीसह 5 अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाईऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची खबळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ या ठिकाणी असणा-या ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
या प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं. गहना वशिष्ठचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्याचंही समोर आलं आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे. या आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली असून, तिला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
गहना वशिष्ठ मॉडेल व अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं असून, मिस आशिय बिकिनी स्पर्धाही तिने जिंकलेली आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य सिनेमातही गहनाने भूमिका केलेल्या आहेत.


Post a Comment

0 Comments