Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक : प्रस्थापित घराण्यांचे गड सुरक्षित ; 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध तर चार जागांसाठी होणार निवडणूक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय उलथपालथ झाली. नगर जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्यांनी आपले गड सुरक्षित ठेवण्यासाठी विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली. यात 21 जागांपैकी सेवा सोसायटी मतदारसंघात 17 जागा बिनविरोध करण्यात यश आले. उर्वरित चार जागांसाठी दि. 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात कर्जत - मीनाक्षी सुरेश साळुंखे × अंबादास शंकरराव पिसाळ, नगर - शिवाजीराव भानुदास कर्डिले × सत्यभामाबाई भगवानराव बेरड, पारनेर - उदय गुलाबराव शेळके × रामदास हनुमंत भोसले तर बिगर शेती संस्थांचा मतदारसंघातून प्रशांत संभाजीराव गायकवाड (पारनेर) × दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे (श्रीगोंदा) आदींमध्ये निवडणुका होणार आहेत
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे अकोले - सिताराम गायकर, जामखेड - अमोल राळेभात, कोपरगाव- विवेक कोल्हे, नेवासा - मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी - आमदार मोनिकाताई राजळे, राहाता-अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, संगमनेर - माधवराव कानवडे, शेवगाव - चंद्रशेखर घुले, श्रीगोंदा - राहुल जगताप, श्रीरामपूर - भानुदास मुरकुटे, अनुसूचित जाती मतदारसंघात अकोला - अमित भांगरे, इतर मागास वर्ग मतदारसंघात श्रीरामपूर- करण जयंत ससाणे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात गणपत सांगळे, शेतीपूरक प्रक्रिया मतदारसंघात कोपरगाव - आमदार आशुतोष काळे, महिला प्रतिनिधी मतदारसंघात श्रीगोंदा - अनुराधा राजेंद्र नागवडे, कर्जत-आशा काकासाहेब तापकीर आदी 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर सोसायटी मतदार संघात कर्जत, नगर, पारनेर आणि बिगर शेती मतदारसंघात 4 ठिकाणांच्या उमेदवारांमध्ये निवडणुका होणार आहेत.


सहकारात राजकीय जोडे बाहेर ठेवायचे असतात : महसूलमंञी बाळासाहेब थोरात 
सहकारात निवडणुकीत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायचे असतात. ते आम्ही बाहेर ठेवले असून या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
श्री थोरात पुढे म्हणाले की, नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. संस्था अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि साखर कारखानदारी चालवताना ही संस्था महत्त्वाचे आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या जितका मेळ घालण्याचा मी तितंका प्रयत्न केला आहे. त्याला बऱ्यापैकी सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अडचण कुठेही नाही, लोकशाही आहे. हुकुमशाही नाही. या निवडणुकीत पक्ष म्हणून आम्ही पाहिले नाही. पक्ष पाहण्याऐवजी जिथे सहकारामध्ये राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायचे असतात, ते आम्ही बाहेर ठेवले आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्था चालवण्यासाठी तसा प्रयत्न केला आहे. त्याला बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. सगळ्यांना एकत्र बसवली असून यात कोपरगाव, अकोला, श्रीरामपूर वाले ही एकत्र बसले यात बऱ्यापैकी चांगले यश आले असल्याचे श्री थोरात यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments