Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने 2017मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्या. विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षेत दत्तात्रय पोटे उत्तीर्ण

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने 2017मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल लागला आहे. या परीक्षेत दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांनी बाजी मारली असून, ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत पोलीस दलातील 4529 उमेदवार बसले, यातील 1451 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते. श्री. पोटे हे पोलीस दलात 2010मध्ये भरती झाले होते. ते आतापर्यंत जामखेड पोलीस स्टेशन, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, तसेच आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत राहिले आहेत.

विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचे भाऊ फौजदार असून, आई-वडील शेती करतात. श्री. पोटे नगर तालुक्यातील बारदारी येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय पोटे यांनी परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत चांगली तयारी केली होती.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. पोटे यांचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक प्राजक्ता सोनवणे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आदींसह कर्मचार्‍यांनी व बारदरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments