Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांचे छापे ; 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा शिवारातील अवैध धंद्यांवर नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी छापे मारून हातभट्टी दारु अड्डे उध्वस्त केले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अनिल टिल्लू पवार (रा पवारवस्ती नेप्ती ता जि अहमदनगर) याच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा मारून काचे रसायन व तयार दारू जागीच नष्ट केली. यामध्ये 21,00 लिटर कचे रसायन 60 रुपये प्रमाणे 1 लाख 26 हजार रुपयांची  100 लिटर तयार दारू 100 रुपये लिटर प्रमाणे 10,000 असा एकूण 1 लाख 36 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल 1 जागेवर नष्ट केला व गुन्हा दाखल केला आहे. कुमार दादाभाऊ फलके (रा निमगाव वाघा ता जि अहमदनगर) याला अटक करून राहते घराचे भिंतीच्या आडोश्याला 72 हजार रूपयांची गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण 1200 लिटर 6 लोखंडी बँरलमध्ये 60 रू लिटर प्रमाणे 60 हजार रू कि चे गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण 1000 लिटर 5 निळे प्लॉस्टीक बँरलमध्ये 60 रू लिटर प्रमाणे 1 लाख 32 हजार रुपयांचा विनापरवाना बेकायदा स्वताचे आर्थीक फायद्या करीता गुन्ह्याचा माल विक्री करण्याचे उद्देशाने स्वतचे कब्जात बाळगताना मिळुन आला आहे. अशा वेगवेगळ्या हातभट्टीचे दारूचे 2 गुन्हे दाखल करून 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments