Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाहनधारकाला 15 फेब्रुवारीनंतरही फास्टॅग न मिळाल्यास त्याला प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार !

 
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई : सर्व वाहनांना जानेवारी 2021 पासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. पण यानंतर सरकारने याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. जी आता जवळ आली आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकाला 15 फेब्रुवारीनंतरही फास्टॅग न मिळाल्यास त्याला प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी जाहीर केलं होतं की, 1 जानेवारी, 2021 पासून टोल बूथवर रोख भरणा किंवा इतर कोणत्याही देय पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत. एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे 75 ते 80 टक्के आहे जो सरकारला 100 टक्के करायचा आहे. यामुळे सरकार 15 फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.
फास्टॅग म्हणजे ? - वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?
एनएचएआय व 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल त


र चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ एनईएफटी /नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.
तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते.
तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.


Post a Comment

0 Comments