Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवारसाहेब खाजगी हॉस्पिटलने लुटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळवून द्या ; पवारांच्या दौरा मार्गावर मनसे करणार बॅनरबाजी - नितीन भुतारे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली. आंदोलन करण्यात आली. उपजिल्हाधिकरी यांच्या समितीने संपूर्ण बिलांचे ऑडीट करुन आतापर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटलकडून जवळपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात आले. हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटलला दिले. परंतु या सर्व हॉस्पिटलांनी या उपजिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली आहे, अशी माहिती मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी नगर रिपोर्टर शी बोलताना दिली.
आजपर्यंत महानगरपालिकेने सुध्दा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित हॉस्पिटल वर केली नाही. कोरोना आजारात गोरगरीब जनतेला बेड सरकारी रुग्णालयात मिळत नव्हते म्हणून नाइलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यांना लाखो रुपयांचे बिले या खाजगी हाॅस्पिटलवाल्यांनी वसुल केले. शासनाने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे हॉस्पिटलवाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लुटमार झाली. त्यामुळे मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठविले परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्ना कडे लक्ष दिले नसल्यामुळे रविवारी देशाचे सर्वोच्च नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख येत आहेत. त्यांच्या हा खाजगी हाॅस्पिटल चा वाढीव बिलांचा प्रश्न मनसे ते येणार त्या मार्गावर ''पवार साहेब गोरगरीब जनतेची कोरोना आजारवरिल वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून द्या'' असे बॅनरलावणार आहे. पवार साहेबांमुळे गोरगरीब जनतेची वाढीव बिलांची रक्कम परत मिळेल अशी अशा आम्ही व्यक्त करतो. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहरध्यक्ष गजेद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हा अध्यक्षा अॅड अनिता दिघे, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे उपशहराध्यक्ष, विभागअध्यक्ष व कार्यकर्ते नियोजन करणार आहेत. सर्व मनसेचे शिष्टमंडळ पवार यांना भेटून या संदर्भात निवेदन देणार आहेत, अशी माहीती मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे. सदर बॅनरवर खाली दिलेल्या हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम मनसे बॅनरवर छापणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment

0 Comments