Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोप झाल्यानंतर विश्वास नांगरे पा. थेट पवारांच्या भेटीला

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबईः  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट पवारांच्या भेटीला पोहोचले. सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील दाखल झाले असून, त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली आहे. 
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणूनच ते आता हा गुंता कसा सोडविता, याकडे सर्वच राजकीय मंडळीचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. विश्वास नांगरे पाटील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments