Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - महाराष्ट्र पोलीसदलाच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 5 जानेवारी रोजी शिर्डी येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती मिळावी म्हणून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूकचे चव्हाण, प्रमुख पाहुणे अमोल पालवे, साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना शिर्डीचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी सांगितले की दोन जानेवारी ते आठ जानेवारी हा पोलीस दलाचा स्थापना सप्ताह सर्व राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरा केला जात असून त्या कार्यक्रमांतर्गत साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना सप्ताह निमित्ताने विविध कार्यक्रम आठ जानेवारी पर्यंत होणार आहेत. शिर्डी मध्ये व परिसरात शासनाच्या आदेशानुसार कोरोणा काळात पोलिसांचे मोठे काम होते व ते त्यांनी यशस्वीपणे केले, त्याच प्रमाणे अद्यापही कोरोणा बाबत दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे, त्यासंदर्भात विविधठिकाणी पोलिसांनी शिर्डीत बॅनर लावले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वच्छता व बाहेर पडताना मास्क वापरणे, सामाजिक दूरचे अंतर राखणे महत्त्वाचे आहे,असे सांगत जर विद्यार्थ्यांनीनी शाळेत येता जाता रोडरोमिओंचा त्रास झाला तर त्यांनी त्वरित पोलिसांशी, शिक्षकांची संपर्क करावा. त्यासाठी पोलीस सदैव तत्पर आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले व विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वरक्षणाची काळजी घ्यावी, त्यासाठी आपण पोलिसांकडून मार्गदर्शन घ्यावे ,असे यावेळी पोलीस निरीक्षक न्याहळदे यांनी सांगितले, यावेळी साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
संकलन : राजेंद्र गडकरी 

Post a Comment

0 Comments