Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय लाक्षणिक संप ; संघटनेचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- राज्य सरकारी कर्मचारी गट -ड च्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन एक दिवशी लाक्षणिक संपा करणार आहेत. याबाबत विविध मागण्यांचे महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना अमदनगरच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. 
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश फंड, उपाध्यक्ष बाबा जगताप, शोभा डहाळे, सल्लागार किशोर सोनवणे, कोषाध्यक्ष पांडुरंग गवळी, दत्तात्रय पवार, सरचिटणीस नामदेव गाडी, संघटक सुभाष सोनवणे, राजू बिडकर, दिगंबर करपे, राजेंद्र मुंगसे, गंगुबाई गिरगुणे, अलका मोरे, लक्ष्मी सोले आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.
गट -ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मंजूर होण्यासाठी शासनाच्या विरोधात दि. 27 जानेवारी रोजी कळ्या फिती लावणार. दि. 28 जानेवारी रोजी दुपारच्या सुट्टीमध्ये कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करून दि. 29 जानेवारी रोजी एक दिवशी राज्यव्यापी लाक्षणिक संप राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. दि. 14 जानेवारी 2016 चा चतुर्थश्रेणी 25% निरसित करण्याचा शासन निर्णय रद्द करणे, अनुकंप भरती तात्काळ 100% करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावून घेणे, वर्ग-4 ची नोकर भरती त्वरित करणे, कंत्राटीकरण पूर्णपणे बंद करणे, 2005 नंतर वर्ग 4 चे कर्मचारी बदली कर्मचारी म्हणून काम करत आहेत अशा 925 कर्मचाऱ्यांच्या पाल्यास एक खास बाब म्हणून कायम करण्याबाबत, जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लाड -पागे समितीच्या सर्व लाभ धारकास तात्काळ सेवेत समायोजन करण्याबाबत, न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग-4च्या अतिप्रदान झालेल्या रकमा वसूली न करण्याबाबत, अशा मागण्या शासनाकडे महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना अमदनगरच्या दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments