Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संभाजी नगरच का ?

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मध्यंतरी एका नेत्याने मिडियावर प्रतिक्रिया दिली " नाव बदलून काय साध्य होनार ? नामांतराला आमचा विरोध " हे कोनत्या पक्षाचे आहेत किंवा ह्यांचा हेतू काय आहे ? ह्या सर्व गोष्टीत मुळीच रस नाही. पन इतिहास पाहिला तर हे नामांतराचे वेड हे 'औरंगजेबालाच' होत. आणि त्याचा हेतु ही स्पष्ट सांगणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजां नंतर मराठे आता खचून गेले असा आंधळा गैरसमज करुन, औरंगजेबाने १९ आॅक्टोंबर १६९९ वयाच्या ८२ व्या वर्षी महाराष्ट्रावर कुच केले आणि मराठ्यांची खरी ताकत म्हणजे त्यांचे गडकिल्ले जिंकण्यात सुरवात केली . या प्रमाणे त्याने मराठ्यांचे १५ गड किल्ले जिंकेले .

त्याने जिंकलेले किल्ले व त्याचे नामांतर ....
१ . वसंतगड - किलीदे फतह 
२. साताऱ्याचा किल्ला - आझमतारा 
३ . सातारा किल्ला - नवरसतारा 
४ . पन्हाळगड - नबीशाहदुर्ग 
५ . पावनगड - बानीशशाहदुर्ग 
६ . वर्धनगड - साधिकगड 
७ . नांदगिरी - नामगीर 
८ . चंदन - मिफ्तह 
९ . वंदन - मफ्तह 
१० . विशाळगड - सकरनला 
११ . सिंहगड - बक्षीनदाबक्ष 
१२ . पुरंदर - अजमगड 
१३ . राजगड - नबीशाहगड 
१४ . तोरणा - फुतुहूलगैब 
१५ . लोहगड - _________

विशेष म्हणजे ' तोरणा ' हा एकच गड औरंगजेबाने लढाई करुन मिळवला. शिवाजी महाराजांचा बौध्दिक 'गणिमी कावा' वापरुन मराठ्यांनी परिस्थितिशी सामना केला. बाकी गड औरंगजेबाने तह करुन मिळविले. औरंगजेबाची पाठ फिरताच हे सर्व गड मराठ्यांनी पुन्हा जिंकल. व पुन्हा भगवा फडकविला. औरंगजेबाच्या ह्या मोहिमेचा हेतु फक्त' जिहाद ' होता. हे त्याचाच दरबारातील इतिहासकाराने' मासिरे आलमगीर' मध्ये लिहून ठेवले आहे .

औरंगजेब आपल्या पत्रात बोलतो
⚈ यावेळी मी जिहाद करित आहे, आणि दृष्ट काफरांचा नायनाट करण्याकरता अखंड परिश्रम करत आहे. धर्माचा अभिमान असणाऱ्या मुसलमानाने या वेळी जिहादीत गुंतलेल्या इस्लामच्या बादशाहला मदत केली पाहिजे." (औरंगजेबाचे गुजरातचा सुभेदारास पत्र‌ इ.स १७०१)
⚈ " ही मोहिम काढण्यांत माझा हेतु केवळ जिहाद करणे हा आहे . या सेवेने परमेश्वर आणि पैगंबर हे संतुष्ट होवोत . उद्या मी स्वार होऊन किल्ल्यावर हल्ला करीन आणि काफरवधाचा ध्वज उभा करीन " ( पानं - ४११) आता प्रश्न हा उभा राहतो , औरंगाबादचे नामांतर का होऊ नये ? एवढ्या धर्मांद क्रुर शासकाचे नाव ह्या शहराला का ठेवावे? येणाऱ्या पिढ्यांनी संभाजीराजेंचा आदर्श घ्यावा का औरंगजेबाचा ? जर खरच देशप्रेम असेल तर नामांतराला विरोध कोनाचच होनार नाही . इथे तुम्ही 'कसाब' पेरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही दुसऱ्या बाजूने ' तुकाराम ओंबळे ' म्हनून उभा राहू . 
" म्हणून संभाजीनगरच ......!
दिलीप सातपुते 
शिवसेना शहर प्रमुख


#राष्ट्रप्रथम 
#संभाजीनगर
#जय_शिवराय 
#जय_शंभूराजे


Post a Comment

0 Comments