Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डेप्युटी आर.टी.ओ दीपक पाटील शासननियमाला तिलांजली देतात मात्र नियमाचा धाक दाखवून लोंकाकडून दंड वसूल ; संबधितांवर कारवाई करावी : मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : खंर तर कायद्याचा धाक दाखवून वाहनचालकांकडून चूकी बद्दल दंड गोळा करतात यासाठी सामान्यांनाही वेढीस धरले जाते पण,स्वत: विनाक्रमांक असलेले व अधिकृत नोंदणी न केलेले वाहन वापरुन अपघाताला निमंत्रण देतात अश्या अधिका-यांविरोधात कारवाई व्हावी व मुंबई सेक्शन ॲक्टनुसार कलम ४॰९ व ४२॰नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतूनच मुक्त करावे, अशी मागणी शेख अजीम, खान फिरोज, अंजर खान आदिनी केली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वरीलसह सरफराज जहागिरदार, शाह फैसल(शानु), वाहिद शेख, शरिफ सय्यद आणि शहेबाज बाॅक्सर ,शहेबाज खानसाहब यांच्या सह्या आहेत.निवेदनात पुढे म्हटले आहे की, येथील डेप्युटी आर. टी.ओ दीपक पाटील यांच्या टाटा हेरियर चारचाकी वाहनाने भिस्त बॅग चौक येथे ३ दिवसांपूर्वी एका टू व्हीलर वाहनाला धडक दिली. त्यामध्ये टू व्हीलर वरील व्यक्तीला किरकोळ मार लागला. त्यावेळी सदरील व्यक्ती व आर.टी.ओ यांच्यामध्ये बाचाबाची झाली . तद्नंतर एका स्थानिक लोकप्रितिनिधींच्या मध्यस्तीने वादावर पडदा टाकत विषय पोलीस स्टेशनला संपवण्यात आला. मात्र,वाहन परवाना,वाहन चालक परवाना आदि नियमांची अंमलबजावणी करण्या-या आर.टी.ओ.अधिकारी विनाक्रमांकाच्या वाहनाचा वापर करुन स्वत:च शासन नियम मोडून वावरत आहे. अपघातामुळे त्यांचे हे गैरवर्तन अपघाचा गुन्हा केल्याने सिध्द झाले.हा प्रकार संताप व्यक्त होणारा आहे.अपघातस्थळी लोकांच्या भावना तीव्र होत्या. शहराला वाहतूकीची शिस्त लावणा-या अधिका-याकडून जे घडले त्याची दखल घेऊन कारवाई झाली तर असे प्रकार पुन्हा घडणार नाही.
आर. टी ओ च्या चारचाकी वाहनास कोणताही प्रकारचा नंबर नव्हता. त्या वाहनाला कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही असे निदर्शनास आले. ते चारचाकी वाहन मागील चार महिन्यांपासून विनानंबर गाडी मिरवत आहे. एका प्रथम वर्ग अधिकाऱ्याने अश्या प्रकारे नियम बाह्य कारभार करणे योग्य आहे का? तरी याविषया मध्ये आपण जातीने लक्ष घालून वरील अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी आपणाकडे रीतसर अर्जाद्वारे मागणी करत आहोत असे म्हटले आहे.Post a Comment

1 Comments

  1. अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे
    www.rokhthok.in

    ReplyDelete