Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मानीव अभिहस्तांतरणासाठी जिल्हा उपनिबंधकांना अधिकार प्रदान


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर :- महाराष्ट्र  मालकी हक्काच्या सदनिका बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री,व्यवस्थापन व हस्तांतरण अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार प्रवर्तकाने संस्थेस मालकी हक्काचे अभिहस्तांतरण करुन देण्याची तरतुद आहे. तसेच विहीत मुदतीत प्रवर्तकाने संस्थेकडे मालकी हक्कांचे अभिहस्तांतरण करुन न दिल्यास  शासनाने मोफा ॲक्ट 1963 मधील कलम 5,10 व 11 मध्ये सुधारणा करुन एकतर्फी मानीव अभिहस्तांतरण करणेची तरतुद केली. जेणे करुन सहकारी गृहनिर्माण संस्थांना इमारतीचा पुनर्विकास, संस्थेला प्राप्त होणारा चटईक्षेत्र निर्देशांक व मालकी हक्क प्राप्त होईल. तसेच मोफा ॲक्ट 1963 मधील कलमन 5,10, व 11 अन्वेय अहमदनगर जिल्हयातील गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाचे प्रमाणपत्र संस्थेस देणेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अहमदनगर यांना अधिकार प्रदान केले आहेत.
 सदर कायद्यानुसार फ्लॅटधारक, गाळेधारक यांनी खरेदी केलेल्या त्यांचे गाळयासंदर्भात त्यांनी ताबेदार न रहाता त्यांची मालकी ज्या  प्लॉटवर, जमीनीवर सदरील अपार्टमेंट, इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे, त्या इमारतीची व जमिनीची मालकी व हक्क संबंधित फ्लॅट धारकांची संस्था, संघटना किंवा कंपनी इ. नावे करुन देण्याची कार्यवाही अभिप्रेत आहे. कायद्यानुसार फ्लॅटधारकांची संस्था संघटना किंवा कंपनीचे बिल्डरने नोंदणी करुन दिली नसल्यास परस्पर नोंदणी करणेची पारवानगी व बिल्डींगचे मालकी हक्क हस्तांतरण करुन देणेसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांना अधिकार प्रदान केले आहेत.
बांधकाम झालेल्या सदनिकांच्या संख्येच्या 60 टक्के सदनिकांची विक्री झाल्यानंतर वरील मोफा कायदा 1963 मधील तरतुदीनुसार सहकारी गृनिर्माण संस्था, संघटना, कंपनीची कायदेशीन नोंदणी करण्याचे बिल्‍डरवर बंधनकारक केलेले आहे. तसेच फ्लॅटधारकांच्या जमा रक्कमेचा हिशोब, नोंदणी, हस्तांतरण बिल्डींग व प्लॉट मालकीप्रमाणे हक्क हस्तांतरण करुन देणे आवश्यक असते. तथापि संबंधित फ्लॅट खरेदीदारांनी प्रतिसादर देऊनही उपरोक्त प्रमाणे पुर्तता न केल्यास फौजदारी कार्यवाहीची तरतुद आहे.
बिल्डरने विक्री केलेल्या फ्लॅटची बिल्डींग व जमीन मालकी हक्क त्यांच्या संस्था असोसिएशनला हस्तांतरण करुन दिलेले नसल्यास हस्तांतरण करुन देणे करिता जिल्हा उपनिबंधक, सहकारी  संस्था यांना प्राधिकृत केले नुसार मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची हस्तांतरण मोकिहम सुरु असुन या मोहिमेचे आवाहनपर पत्र संबंधित गृनिर्माण, सहकारी संस्थाना पोहोच करुन मानीव अभिहस्तांतरण आवश्यक असलेल्या संस्थांची प्रकरणे तयार करण्र, आवश्यक कागदपत्रांचे संकलन करणे व त्या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच सबंधित मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रीया अत्यंत सुटसुटीत असुन सुनावणी कामकाज व दस्त नोंदणीची प्रक्रिया याबाबत अडीअडचणी संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत असुन मानीव हस्तांतरण आवश्यक असणा-या अपार्टमेंट धारकांनी या मोहिमेत भाग घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन इमारत संस्थेची जमीनीची मालकी संस्थेची या संकल्पनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल. प्लॉटधारक सहकारी संस्था, असोसिएशन, कंपनी यांच्या इमारतीची मालमत्ता पत्रकात मालकी हक्कात नोंद नसल्यास त्यांनी उपरोक्त मोहिमेत भाग घेऊन मालकी हक्कांत प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
मानीव अभिहस्तांतरणाचे सहकारी संस्था, असोसिएशन, कंपनी करीता फायदे- प्लॉटची मालकी संस्थेची,असोसिएशन, कंपनी पर्यायाने सभासदांची राहील, भविष्यात वाढीव एफ. एस. आय. मिळाल्यास त्याचा फ्लॅट धारकांना फायदा होईल. टी. डी. आर मिळाल्यास त्याचा उपयोग घेता येईल. भविष्यात इमारतीचे पुर्ननिर्माण करावयाचे झाल्यास त्यांचे हक्क व फायदा सभासदास मिळतील. पर्यायाने इमारत आमची मालकी आमची होऊन प्रत्याक्षात बिल्डर ऐवजी प्लॉट व बिल्डींगची मालकी प्राप्त होईल. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,अहमदनगर  यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments